News Flash

करोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याचं कळताच पत्नीची तीन वर्षाच्या मुलासह आत्महत्या; नांदेडमधील ह्रदयद्रावक घटना

आई-वडिलांविराना दोन मुली मात्र पोरक्या झाल्या आहेत

पतीचं करोनामुळे निधन झाल्याची माहिती मिळताच पत्नीने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. नांदेडच्या लोह शहरात ही घटना घडली आहे. महिलेने दोन्ही मुलींना घरी ठेवून तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आई-वडिलांविना मुली पोरक्या झाल्या आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शंकर गदम (40) मूळ आंध्र प्रदेशातील होते. मजुरी करणारे शंकर गदाम हे लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे पत्नी दोन मुली व एक मुलासह राहत होते. शंकर गदम यांचा करोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर लोहा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्‍यान शंकर गदम यांचा मुत्यू झाला. ही घटना समजली असता त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला. मंगळवारी मध्यरात्री लहान मुलाला सोबत घेऊन त्यांनी शहराजवळ असलेल्या सुनेगाव तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी लोहा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक करे हे करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 3:59 pm

Web Title: wife commit suicide after husband died due to covid 19 in nanded sgy 87
Next Stories
1 Coronavirus – पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पत्र, म्हणाले…
2 ‘रेमडेसिवीर’साठी आता निर्यात बंदी असलेल्या कंपन्यांकडून माल घेण्याचे प्रयत्न सुरू – टोपे
3 “मला चंपा म्हणणं थांबलं नाही तर…,” चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा
Just Now!
X