23 February 2020

News Flash

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला

तोंडात डांबर गोळ्या जबरदस्तीने कोंबल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठाणे : भिवंडी येथील शांतीनगर परिसरात एका तरुणाने दारूच्या नशेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या तोंडात डांबर गोळ्या जबरदस्तीने कोंबल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली असून यातील महिलेची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे.

भिवंडी येथील शांतीनगर परिसरातील आयजीएम रुग्णालय परिसरात पीडित ३० वर्षीय महिला राहते. बुधवारी रात्री तिचा पती दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादादरम्यान त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि त्यानंतर त्याने डांबर गोळ्यांचा कूट करून तो तिच्या तोंडात जबदस्तीने कोंबला. या प्रकारानंतर तिने त्याच्या तावडीतून कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर तिने घराबाहेर पडून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलाविले. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे.

First Published on February 15, 2020 12:11 am

Web Title: wife murder fatal attack crime news akp 94
Next Stories
1 इस्राइली तंत्रज्ञानाने रंगीत कलिंगड, मिरच्यांची शेती
2 रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात पोलिसांना बसण्यासाठी मिळाली खुर्ची
3 तर बायको मला हाकलून देईल, असं अजित पवार म्हणाले आणि…
Just Now!
X