पतीच्या चुलत भावाशीच अनतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीनेच आपल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अवघ्या दहा तासांत अटक केली. एका पस्तीस वर्षांच्या युवकाचा खून करून हिवरखेडा शिवारातील ओढय़ात प्रेत पोत्यात बांधून टाकल्याची घटना २१ जुलै रोजी उघडकीस आली होती. तपासाअंती हे प्रेत सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील संजय भिकाजी तनपुरे यांचे असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. यावेळी पोलिसांचा संशय मृताच्या पत्नीवर होताच. मृतावर कापडसिंगी येथे अंत्यसंस्कार होताच पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, पो. कॉ. शेख ताज, अशोक हिंगे, महिला पोलीस शिवनंदा फोले यांनी पत्नीस ताब्यात घेतले.
मागील दोन वर्षांपासून संजय तनपुरे हा आपल्या पत्नीसह झरी येथील आखाडय़ावर सालगडी म्हणून राहात होता. या दरम्यान त्याचा टिटवी ता. लोणार येथील चुलतभाऊ श्रीहरी भागाजी तनपुरे (वय २८) हा आखाडय़ावर अधूनमधून येत होता. या दरम्यान त्यांचे अनतिक संबंध मृताची पत्नी गयाबाई (वय ३०) हिच्याशी जुळले. त्यामुळे त्याचे येणे-जाणे आखाडय़ावर वाढले. १८ जुल रोजी संजय तनपुरे हा परभणी येथे कामानिमित्त गेला. तो रात्री आठच्या सुमारास आखाडय़ावर दारू पिऊन आला. भावाच्या व पत्नीच्या वागण्याचा संशय आल्याने त्याने पत्नीस मारहाण सुरू केली. प्रेयसीस मारहाण केल्याचा राग आल्याने चुलत भाऊ व गयाबाईने संजय याच्या डोक्यात काठीने मारहाण केली. यातच तो मृत झाला. रात्री अकराच्या सुमारास दोघांनी हे प्रेत पोत्यात बांधून मोटारसायकलने दुधगांव-आडगाव, इटोलीमाग्रे आणून हिवरखेडा शिवारात फेकून दिल्याची माहिती मृताच्या पत्नीने दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली.