20 February 2019

News Flash

घटस्फोट न देणाऱ्या पत्नींचे जिवंतपणी पिंडदान

पत्नीचे पिंडदान करण्याचा कार्यक्रम येथील गोदाघाट परिसरात पार पाडला

(संग्रहित छायाचित्र)

पत्नीपीडितांसाठी वास्तव फाऊंडेशनचा उपक्रम; पुरोहितांकडून विरोध

नाशिक : सध्या पितृपक्ष सुरू आहे. पूर्वजांचे स्मरण करत त्यांना श्राद्ध  घालण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे. मात्र या परंपरेला मुंबई येथील वास्तव फाऊंडेशनने छेद देत पत्नीपीडित पतींना एकत्र करत जिवंतपणीच पत्नीचे पिंडदान करण्याचा कार्यक्रम येथील गोदाघाट परिसरात पार पाडला. या प्रकाराला पुरोहित संघाने विरोध दर्शविला आहे.

पत्नीशी पटत नाही, परंतु पत्नी घटस्फोटही देत नाही, अशा विचित्र कात्रीत सापडलेल्या पत्नी पीडितांनी एकत्र येत वास्तव फाऊंडेशनच्या मदतीने रविवारी येथील गोदाकाठावर पत्नीच्या जिवंतपणीच पिंडदान केले. पत्नी घटस्फोट देत नाही. स्वेच्छेने लग्न न केल्याने वा लग्नानंतर जबाबदारी पेलू शकत नाही, अशा विविध कारणांमुळे लग्न मोडतात. पुरुषांना हे मानायला कठीण जाते, तर काही प्रकरणांमध्ये पुरुषांची चूक नसतानाही त्यांच्यासह कुटुंबीयांना पोलीस चौकी, न्यायालयात हेलपाटे मारावे लागतात.

कधी खोटय़ा आरोपाखाली पोलीस कोठडी किंवा तुरुंगातही जावे लागते. घटस्फोटासाठी होणारा कालापव्यय पाहता संस्थेने जिवंतपणी पत्नीशी श्राद्ध घालत तिच्याशी असलेले नाते तोडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, गोदाकाठावर जिवंत पत्नीचे श्राद्ध घालत असल्याची माहिती काही पुरोहितांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पिंडदान सोहळ्यास विरोध केला.

First Published on October 9, 2018 2:18 am

Web Title: wife pinddan event in godaghat area by vaastav foundation