05 August 2020

News Flash

“येत कसा नाही आलाच पाहिजे”, नवरा अमेरिकेतून परत येत नसल्याने बायकोचं आंदोलन

मुलीवरचा अन्याय समाज सहन करणार नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या

आपल्या मागण्यांसाठी किंवा प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी लोक आंदोलन करत असल्याचं चित्र आपण अनेकदा पाहिलं आहे. पण एखादी महिला आपल्या पतीविरोधात आंदोलनाला बसल्याचं आपण कधी ऐकलं किंवा पाहिलं नसेल. पण असाच एक प्रकार सध्या औरंगाबादमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. औरंगाबादमधील वैजापूर येथे महिलेने आपला पती अमेरिकेहून परत येत नाही म्हणून थेट आंदोलन पुकारलं आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात ती एकटी नसून तिचं संपूर्ण कुटुंबही आंदोलन करत आहे. सासरच्या दारातच सुरु असलेल्या या आंदोलनात घोषणाबाजी देत न्याय देण्याची मागणी होत आहे.

प्राजक्ता डहाळे असं या महिलेचं नाव आहे. आपला पती अमेरिकेला गेला असून वारंवार विनंती करुनही परत येत नाही. म्हणूनच आपण आंदोलन करत असल्याचं ती सांगते. दरम्यान आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप प्राजक्ता डहाळे यांनी केला आहे.

“१३ जानेवारी रोजी आपण जे आंदोलन केलं ते आपला पती अमेरिकेतून परत यावा यासाठी केलं होतं. उपोषानंतर सासू, दीर यांनी आपल्याला मारुन टाकण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण द्यावं. तसंच पती लवकरात लवकर भारतात परत यावा यासाठी सहकार्य करावं,” अशी विनंती प्राजक्ता डहाळे यांनी केली आहे.

हे उपोषण सध्या मागे घेण्यात आलं आहे. अमेरिकेतील पतीला औरंगाबादमध्ये बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसंच पोलिसांना दोन्ही कुटुंबाशी चर्चा करुन सामंजस्याने वाद मिटवावा असा आदेश देण्यात आला आहे. १३ फेब्रुवारी रोजी मुलगा परत येईल असं सासरच्या मंडळींनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 8:48 am

Web Title: wife protest against husband staying in us aurangabad sgy 87
Next Stories
1 “फुटकळ लेखकाला भाजपातून हाकलून का दिले नाही?”
2 सिंचन घोटाळा प्रकरण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखल केले शपथपत्र
3 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुणीच्या कारला भीषण अपघात
Just Now!
X