प्राणिगणनेत बिबटे, गवे, अस्वलासह ५५५ वन्यप्राणी आढळले

चांदोली राष्ट्रीय अभयारण्यामध्ये ३ बिबटे, १६९ गवे, २० अस्वलासह ५५५ वन्यप्राणी असल्याचे मोजणीत आढळून आले आहे. मात्र सागरेश्वर अभयारण्यातून काळवीट गायब झाले आहे तर, सांबरांची संख्या २६ ने घटली आहे. वन विभागाने १ हजार १६५ चौरस किलोमीटर असलेल्या या अभयारण्यातील वनप्राण्यांची मोजदात नुकतीच पूर्ण केली.

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Unseasonal rain Buldhana district
बुलढाणा जिल्ह्यावर निसर्ग कोपला! गारपीटसह अवकाळीचे थैमान; रब्बी पिकांची प्रचंड हानी
Marathi Bhasha Din 2024 Oldest Inscription at Akshi Alibaug in Marathi
मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कोणता? तो कुठे आहे? काय लिहिले आहे त्यात?

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात महत्त्वाचे मानले जाणारे चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात विविध वन्य प्राणी वास्तव्यास आहेत. या वन्य प्राण्यांची वन विभागाच्या वतीने ट्रान्झीट लाइन व पाणवठय़ावर येणाऱ्या वन्य प्राण्यांची मोजदाद करण्यात आली. ३ मे ते ११ मे दरम्यान हा गणना करण्यात आली.

या वेळी चांदोली अभयारण्याच्या विविध विभागात ३ बिबटे आढळून आले असून १६९ गवे आढळले. याशिवाय अन्य वन्य प्राणी पुढीलप्रमाणे आढळले. रानडुकर १६८, अस्वल २०, १७ सांबर, ५ शेकरू, १ गरुड, ५ सािळदर असे ५५५ वन्य प्राणी आढळले आहेत. आढळलेल्या ३ बिबटय़ापकी १ बिबटय़ा गोठणे नियतक्षेत्रात, १ हेळवाक् वनपरिक्षेत्रातील उत्तर विभागात तर अन्य १ दक्षिण विभागात आढळला.

ट्रान्झीट लाइन पद्धतीने व बुद्ध पौर्णिमेदिवशी पाणवठय़ावरील गणना करण्यात आली. प्राणी गणनेसाठी १६ विभाग करण्यात आले होते. प्रत्येक विभागात दोन ट्रान्झीट लाइन आहेत. हजार हेक्टर क्षेत्रासाठी एक लाइन धरण्यात आली होती. प्रत्येक विभागासाठी तीन प्रगणक होते. सकाळी साडेपाच ते सात या वेळेत या लाइनवरून फिरून गणना करण्यात आली. तसेच प्राण्याची विष्ठा, झाडावरील ओरखडे यांच्याही नोंदी करण्यात आल्या.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत ११६५.५७ चौरस किलोमीटर क्षेत्र असून यापकी ६००.१२ चौरस किलोमीटर क्षेत्र कोअर झोन तर ५६५.४५ चौरस किलोमीटर क्षेत्र बफर झोन आहे. मुख्य वन संरक्षक डॉ. व्ही कलेमेट बेन, उपसंचालक डॉ. विनिता व्यास, कुंडल वन अकादमीचे महासंचालक सर्फराज खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्राणी गणना करण्यात आली.

दरम्यान, मानवनिर्मित असलेल्या सागरेश्वर अभयारण्यातील काळवीट गायब झाल्याचे निदर्शनास आले असून हरणांनी चाऱ्याच्या शोधात अभयारण्यातून शेतीकडे धाव घेतली आहे. सागरेश्वर अभयारण्यातही वन्य प्राणी गणना करण्यात आली असून या ठिकाणी चितळ १२३, सांबर ३६२, ससा १४, रानडुक्कर ३४, वानर ३७, कोल्हा २ आढळून आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चितळची संख्या ४ ने वाढली असली, तरी सांबरांची संख्या २६ ने कमी झाली आहे. दोन वर्षांपूर्वी दिसणारे सांबर मात्र या वेळी आढळले नाही.

अभयारण्यात करण्यात आलेली वन्य प्राण्याची गणना शास्त्रीय कसोटीवर मान्य होत नसल्याचे सांगत वन्य प्राणी मित्र पापा पाटील यांनी सांगितले, की सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांचे अस्तित्व आहे. वन्य प्राण्याची शिकार होऊ नये यासाठी काही माहितीही गोपनीय ठेवणेच गरजेचे असल्याचे आग्रहाने त्यांनी सांगितले.