करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, अशात यंदा गणेशोत्सवात गणेशमूर्तींची उंची कमी करुन उत्सवाची उंची वाढवू असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यासंदर्भात मुंबईतील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत आहेत.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
यंदा गणेशमूर्तींची उंची किती असावी यासंदर्भात मी गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी बोललो आहे. तसेच मी आता मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहे. पुढील दोन दिवसांमध्ये गणेश मूर्तींची उंची किती असावी याबाबतचा निर्णय जाहीर करेन”

आपल्याला लोकमान्य टिळकांची परंपरा पुढे घेऊन जायची आहे. पण ती सुरक्षित व्हायला हवी, यंदाच्या वर्षी गणेशमूर्ती दोघांना उचलता येईल अशीच बनवावी जेणेकरुन सुरक्षेचे आणि इतर प्रश्न सुटतील असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.