22 January 2018

News Flash

दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रात फटाकेविक्रीवर बंदी?, रामदास कदम यांचे संकेत

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिल्लीत फटाके विक्रीबंदी कायम ठेवली होती.

मुंबई | Updated: October 10, 2017 2:25 PM

दिल्लीपाठोपाठ आता राज्यातही फटाकेविक्री बंदीची चर्चा सुरु झाली आहे. फटाकेविक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. विशेष म्हणजे रामदास कदम यांनी सूचक विधान केले असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र फटाकेविक्री बंदीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे फटाकाविक्री बंदीवरुन शिवसेनेतच दोन गट पडल्याचे दिसते.

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिल्लीत फटाके विक्रीबंदी कायम ठेवली होती. दिल्लीत ११ नोव्हेंबर २०१६ पासूनचा फटाके विक्रीच्या बंदीचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला. फटाक्यांमुळे दिल्लीत हवेत प्रदूषणाची पातळी वाढलेली असते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता.

दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी महत्त्वपूर्ण विधान केले. फटाकेविक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केल्यास राज्यातील हवामान सुधारेल आणि शेवटी शेतकऱ्यांनाच याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.

मंगळवारी मुंबईत राज्य सरकारतर्फे ‘प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान २०१७’ आयोजन करण्यात आले. फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनीची प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने हे अभियान राबवले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणार अशी शपथ घेतली. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी फटाकेविक्री बंदीला विरोध दर्शवला आहे.

First Published on October 10, 2017 2:17 pm

Web Title: will talk to cm fadnavis then decide about ban firecrackers in maharashtra says environment minister ramdas kadam
 1. S
  surendra
  Oct 11, 2017 at 3:37 pm
  Hindu sana var bandi aana ani deshana islamik desh gho kara himat asel ter
  Reply
  1. A
   arun
   Oct 10, 2017 at 9:41 pm
   शपथ घेण्याची कसली नाटक करता ? चार दिवस दिवाळीचे त्यात रात्री आणि पहाटेच फटाके उडवतात. त्या निमित्ताने मुलांना सावधानता कळते. पर्यावरणाचीच काळजी असेल तर आधी फुरसुंगी, देवनार, मिठी नदी, सर्व नद्या सांडपाणी मुक्त करण्याची शपथ सर्व उद्योजकांनी आणि मंत्र्यांनी घ्यावी. मंत्र्यांनी मोठमोठाने भाषण झोडपून आवाजच प्रदूषण थांबवावं. रहिवासी फटाक्यांनी आगी न लावू देण्यात दक्ष असतातच. त्यापेक्षा विषारी वायूच्या फटाक्यांवर बंदी आणावी. प्रत्येक प्रश्नावर कोर्टाकडेच जनतेला जायलाच हवं का ? जनतेच्या सुरक्षेचा हा प्रश्न सरकारचा आहे .आजवर अनेक पिढ्या जगाच्या पाठीवर फटाके उडवून मोठ्या झाल्यात त्यांना हि नाटकं करावी लागली नाहीत. सरकारने त्यापेक्षा वाहन विक्रीवर बंदी आणून, त्यांची संख्या कमी करून शहर पर्यावरण मुक्त करण्याची आपली कळकळ दाखवावी. नशीब की सीमेवर जाऊन तोफा आणि बंदुकांचा प्रदूषण थांबवण्याची याचिका अजून कुणी केली नाही.
   Reply
   1. S
    Santosh Rane
    Oct 10, 2017 at 9:30 pm
    अतिशय चांगला विचार कर्त्या आहेत रामदासजी रामदास भाई करून दाखवा !!! आपल्या ला धान्यवाद ,लोक आपलय ला दुवा देतील. फक्त कायदा करून फ्यायाद्या नाही ,आ बजावणी झाली पायजी .
    Reply
    1. A
     Arun
     Oct 10, 2017 at 4:43 pm
     विचार पक्का होई पर्यंत फटाके विक्री होऊन जाईल आणि मग फटाके विकत घेतलेली जनता ते फटाके पाण्यात विसर्जन करतील? दहीहंडीचे थर, दिवाळीचे फटाके, बोर्डाच्या परीक्षांचे निकाल आदी बाबत निर्णय घ्यायला शेवटच्या घटकेपर्यंत वाट का पहाता? २-३ महिने आधीच का नाही हे सगळं ठरवत?
     Reply
     1. B
      Bahujan
      Oct 10, 2017 at 4:15 pm
      विनाकारण काही निर्णय घेऊ नका, पर्यावरण मरुद्या लोक उगीच तुमच्या नावाने खडे फोडून जनमत तुमच्या विरुद्ध जाईल. फार तर कोर्ट ने निर्णय दिला तर ठीक आहे, शासनाने लोकांना नाराज करू नये हा मोलाचा सल्ला. तुम्ही पर्यावरण वाचवल्याने काही फायदा होणार नाहीये, भाल्याची दुनिया नाहीये सध्या.
      Reply
      1. sachin pawar
       Oct 10, 2017 at 3:47 pm
       Karun tar dakhva....bjp che divas bharle vatata
       Reply
       1. Govind Jadhav
        Oct 10, 2017 at 3:38 pm
        फटाके बंद चा निर्णय चांगला आहे .मुंबईत तर पूर्ण बंद कराच पण इतर ठिकाणीसुद्धा ४० डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे फटाके बंदच करा .हा निर्णय त्वरित घ्या अन्यथा दिवाळी नंतर घेऊन उपयोग नाही .
        Reply
        1. राजाराम भारतीय
         Oct 10, 2017 at 3:19 pm
         निदान मुंबईत तरी फटाके विक्रीवर बंदी घालावी.दीपावली आकाश कंदील आणि दिवे लावून साजरी करावी.
         Reply
         1. P
          Prof. Uttam Kadam
          Oct 10, 2017 at 3:13 pm
          If yes it will be nice
          Reply
          1. Load More Comments