गुटख्याची गाडी सोडली नाही म्हणून संतापलेल्या भाजपा आमदाराने पोलीस निरीक्षकाला दमबाजी केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. गंगापूर- खुलताबादचे आमदार प्रकाश बंब यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

गंगापूर पोलिसांनी गुटख्याची एक गाडी पकडली होती. ती गाडी आमदार प्रकाश बंब यांच्या कार्यकर्त्याची होती, अशी चर्चा आहे. ती गाडी सोडण्यासाठी आमदार बंब यांनी पोलिसांना फोन केला. मात्र, पोलीस ऐकत नसल्याने आमदार बंब थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान

‘मला कळतं कुठे काय चालतं ते. याबाबत लोकप्रतिनिधींनी पोलिसांना सांगू नये आणि पोलिसांनी लोकप्रतिनिधींना शिकवू नये. आजपासून विभागात कुठेही अवैध धंदे चालणार नाही. सीएम साहेबांकडून मुंबईतून बदली करायला लावेन’, अशी धमकी देताना ते व्हिडिओत दिसत आहेत. आमदाराचा फोन आल्यावर कुठलीही गाडी सोडलीच पाहिजे आणि माझे म्हणणे ऐकत नसाल तर बदली करुन टाकेन, असा धमकीवजा इशाराच त्यांनी पोलिसाला दिला.

दरम्यान, बंब यांनी माध्यमांना याबाबत प्रतिक्रिया दिली. हा पोलीस अधिकारी गाड्या पकडतो. मग पैसे घेऊन सोडून देतो, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे त्या पोलीस निरीक्षकावर रागावलो होतो. मात्र, त्यांना दमबाजी केली नाही, असे त्यांनी सांगितले.