News Flash

सांगलीत मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला, २५ मेंढ्या मृत्यूमुखी

हल्ल्यात पाच मेंढ्या जखमी झाल्या आहेत

सांगलीत मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आटपाडी तालुक्यातील हिवतड येथे ही घटना घडली. लांडग्यांच्या हल्ल्यात २५ मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या असून पाच मेंढ्या जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेतात बसवल्या गेलेल्या मेंढ्यांच्या कळपावर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास लांडग्यांच्या कळपाने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मेंढ्यांना बचाव करण्याची संधी मिळाली नाही. सतीश तातोबा शेळके (रा. कन्हरेवाडी, ता .करवीर जिल्हा कोल्हापूर) यांच्या मालकीच्या या मेंढ्या होत्या. यामुळे त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 11:50 am

Web Title: wolf attack sheeps in sangli sgy 87
Next Stories
1 मनोज वाजपेयीही म्हणतोय, ‘आरे’…
2 पक्षातील बेदिली रोखण्याचे भाजपपुढे आव्हान ! सांगलीत मुख्यमंत्री फडणवीस यांची कसोटी
3 विदर्भात इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता
Just Now!
X