02 March 2021

News Flash

पोलिस ठाण्यात महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

प्रकृती खालावल्याने महिलेला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

चंद्रपूर : जिवती पोलीस ठाण्यात शेणगाव येथील महिलेने ठाणेदाराच्या समोरच  विष प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे.ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. सदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेणगाव येथील रामा गोटमवाड आणि शेजारी यांच्यात ७ जानेवारीला भांडण झाले. रामा गोटमवाड यांनी जिवती पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार करण्यापेक्षा आपसी समझोता करून घ्या असे ठाणेदार संतोष अंबिके यांनी सांगितले. दरम्यान विनाकारण संपुर्ण दिवस ठाण्यात ठेवल्यामुळे कंटाळून रामाची पत्नी परवीन रामा गोटमवाड या हिने ठाण्यातच विष प्राशन केले. यानंतर तिला तातडीने गडचांदूर येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती खालावल्याने महिलेला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 12:03 am

Web Title: woman attempted suicide by poisoning at the police station zws 70
Next Stories
1 सोलापुरात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना विशेष बसने पाठवले मध्य प्रदेशात
2 साताऱ्यात उदयनराजेंनी जमवलेल्या गर्दीची होणार चौकशी
3 भंडारा रुग्णालय अग्नितांडव प्रकरण- सरकारकडून चौकशीसाठी समिती स्थापन
Just Now!
X