13 August 2020

News Flash

युवतीवर बलात्कार करून जिवे मारण्याचा प्रयत्न

पीडितेला गडचिरोली येथे रुणालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

गडचिरोली : एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडित तरुणी गडचिरोली येथे उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर आहे. राजेश सुरेश कांबळी (३०), त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित युवती काम आटोपून ती रविवारी रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास काम आटोपल्यानंतर बसस्थानकावर पोहचली. मात्र बराच वेळ वाट बघूनही बस आली नाही. दरम्यान, तिची ओळख असलेला राजेश कांबळी तेथे आला. तिने त्याला उशीर झाल्याने घरी मोटारसायकलने सोडून देण्याची विनंती केली. राजेशने होकार दिला व दोघेही दुचाकीने निघाले. मात्र राजेशने तिला एका शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला व त्यानंतर तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. गळा दाबल्यामुळे ती बेशुद्ध झाली. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपी राजेश तिचा मोबाईल व अन्य सामान घेऊन तेथून पळून गेला. रात्र होऊनही मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी मुलीच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कोणताही संपर्क होत नसल्याने युवतीचे वडील व भावाने ती काम करीत असलेले ठिकाण गाठले. तेथे विचारणा केली असता ती सात वाजताच गेल्याचे सांगण्यात आले. इकडे ती शुद्धीवर आल्यावर तेथून जवळच असलेल्या लोकांना आपबिती सांगून मदत मागितली. नागरिकांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तेव्हा वडील व भाऊ तेथे आले व तिला घरी घेऊन गेले. रात्री कुटुंबीयांसोबत तिने देसाईगंज पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडितेला गडचिरोली येथे रुणालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 3:09 am

Web Title: woman attempts to kill after rape zws 70
Next Stories
1 मनपातील भाजपच्या पाठिंब्याबाबत राष्ट्रवादीचा दि. २४ पूर्वी फेरनिर्णय
2 नाशिकमध्ये कांदादरात दोन हजारांनी घसरण
3 ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळा उद्ध्वस्त; मात्र संस्थाचालकांनाच दंड
Just Now!
X