डहाणू : डहाणू तालुक्यातील सोनाळेमध्ये पैशाच्या वादातून एका कुटुंबावर केलेल्या केलेल्या प्राणघातक हल्लय़ात एका महिला ठार झाली. तिचा पती, लहान मुलगा आणि सवत असे तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.४५ वाजता घडली.
पहाटेच्या सुमारास अचानक घरात घुसलेल्या व्यक्तीने केलेल्या हल्लय़ात पती विलास वांगड (४२) याला वाचवण्यासाठी गेलेली पत्नी वैशाली विलास वांगड (३५) हिचा जागीच मृत्यू झाला. तर विलास वांगड त्याची दुसरी पत्नी वंदना विलास वांगड (३६), मुलगा समीर विलास वांगड (१८) हे तिघेही जण गंभीर जखमी आहेत. त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विलास वांगड याची प्रकृती चिंताजनक असून त्याला मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना जुन्या आर्थिक व्यवहारातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 13, 2020 12:11 am