loksatta, loksatta online, marathi, marathi news, Marathi news, Marathi news paper, Marathi, Marathi news online, Marathi paper, News online, Loksatta news paper,News, Marathi bollywood news, Marathi Sports news, Marathi political News, Marathi Trending News, Marathi Entertainment news
News Flash

धक्कादायक..! सांगलीत नवऱ्याला कारमध्ये डांबून गर्भवतीवर सामूहिक बलात्कार

आठ जणांनी नवऱ्याला कारमघ्ये डांबून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

महिला सुरक्षेचे लाख दावे केले जात असले तरी देशाच्या राजधीन महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.

सांगली – आठ महिन्याच्या गर्भवती महिलेवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तासगावजवळ घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री तुरची फाटा येथे हा प्रकार घडला आहे. आज सकाळी तासगाव पोलिसात पीडित महिलेने आठ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार करणारी महिला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आठ जणांनी नवऱ्याला कारमघ्ये डांबून सामूहिक बलात्कार केला.

सागर, मुकुंद माने, जावेद खान, विनोद यांच्यासह आणखी चार जणांविरोधात तासगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केली आहे. तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे गेल्या काही दिवसांपासून तुरची फाट्यावर हॉटेल व्यावसाय करत होते. हॉटेल कामासाठी त्यांना एक जोडपे हवे होते. त्यांनी तसे एका ग्राहकाला सांगितले. मंगळवारी आरोपी मुकुंदने पतीशी संपर्क साधून तुम्हाला हवे असलेले जोडपे मिळाले असल्याचे कळवले. त्यांना भेटण्यासाठी तुम्ही तुरची फाट्यावर या आणि अ‍ॅडव्हान्स देण्यास २० हजार रुपये घेऊन येण्यासही सांगितले.

तुरची फाटा येथील एका चाळीजवळ पीडिता आणि पती पैसे घेऊन गेले असता, दाम्पत्यास प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडील सोने आणि रोकड हिसकावून घेतली. त्यानंतर पीडित महिलेच्या पतीला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये डांबून ठेवले व महिलेवर तेथीलच एका खोलीत बलात्कार केला. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागालाही तपासाचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 12:16 pm

Web Title: woman file complaint out gangrape case register tasgaon police station
Next Stories
1 शिवसेनेच्या ‘टक्केवारी’मुळे मराठी माणसाची अधोगती: नारायण राणे
2 उद्धव ठाकरेंना आरक्षणातलं काय कळतं: नारायण राणे
3 जळगावमध्ये कार अपघातात चार ठार
Just Now!
X