News Flash

पाच जणांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अकोला : पाच जणांनी एका ४४ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना बुधवारी रात्री मलकापूर-येवता मार्गावरील खदानीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. तीन आरोपी फरार असून, त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या युवकासोबत ४४ वर्षीय महिलेची ओळख होती. त्या युवकाच्या मोठय़ा भावाने महिलेला घरी घेऊन जातो म्हणून बुधवारी रात्री नेले. त्या युवकासोबत त्याचे तीन मित्र सोबत होते. ते येवता-मलकापूर मार्गावरील निर्जन स्थळी थांबले. त्या महिलेला दुचाकीवरून खाली उतरून अंधारात नेले. त्याठिकाणी महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्या महिलेला त्याच ठिकाणी सोडल्यानंतर चक्कर येऊन महिला खाली पडली. उपचारासाठी महिलेने कसेबसे सवरेपचार रुग्णालय गाठले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्रासाबद्दल विचारणा केली असता महिलेने तिच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालय गाठून पीडित महिलेचे बयाण नोंदवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पाच आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 3:46 am

Web Title: woman gangrape raped in akola district
Next Stories
1 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा अतिउत्साह शिपायांच्या जीवावर?
2 कुरखेडा हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांचे गावागावात बॅनर
3 तीन शोकांतिकांचा ‘स्नेहांकुर’च्या दत्तक विधानातून सुखान्त!
Just Now!
X