प्रतापगडावरून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केली आहे अशी माहिती समोर आली आहे. ज्योती नवनीनत बल्लाळ असे या महिलेचे नाव आहे. ती कामोठे, नवी मुंबई येथील रहिवासी होती. प्रतापगडावरच्या कडेलोट पॉईंटवरून या महिलेने उडी मारून आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. सह्याद्री आणि महाबळेश्वर ट्रेकर्सची माणसे तिथे पोहचली असून या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे अशी माहिती मिळते आहे. या महिलेने आत्महत्या का केली त्याचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस पुढील तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 4, 2018 3:31 pm