News Flash

हृदयद्रावक! : तीन वर्षाच्या चिमुरडीची हत्या करून आईनेही घेतला गळफास

करोनामुळे हाताला काम नाही मग दूध कुठून आणणार?

(प्रातिनिधिक छायाचित्र)

आदिवासी कातकरी समाजचे दुर्भिक्ष्य आजही बघावयास मिळत आहे. जव्हार तालुक्यातील देहेरे पैकी कडव्याचीमाळ येथील एका महिलेनं आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह स्वत:ही आत्महत्या केली. मंगला वाघ (वय 30) या विवाहितेने घरची हलाकीच्या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली. बोरीचमाळ येथील मोहाच्या झाडाला तिने आधी तीन वर्षीय मुलगी रोशनी हिला साडीने गळफास दिला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान घटना मंगळवारी घडली मात्र ती बुधवारी सायंकाळी उघडकीस आली, मंगळवारी दिलीप कामावरून घरी परत आल्यानंतर पत्नी व लहान मुलगी घरी नाही म्हणून मोठ्या मुलीला विचारले मात्र तिलाही माहीत न्हवते, याने ती नातेवाईकांकडे गेली असेल येईल संध्याकाळ पर्यंत असा अंदाज केला, पण ती रात्र झाली तरी काही घरी आली नाही, त्यामुळे मंगळवार रात्री पासून ते बुधवार सकाळ पर्यंत त्याने आजूबाजूच्या नातेवाईकाच्या घरी फिरला मात्र तेथेही तिचा पत्ता लागला नाही, बुधवारी दुपारी तो व तिची मोठी मुलगी हिला घेऊन नवापाड येथे आला असता तेथील एका मुलाने व्हाट्सएपवर एका महिलेने व सोबत एका लहान मुलीने बोरीचमाळ येथील मोहाच्या झाडाला साडीने गळफास घेतल्याचे फोटो दाखवले त्यावेळी त्याला हे बघून त्याला धक्काच बसला ती मंगला व तिची मुलगी रोशनी हिचाच फोटो असल्याचे निष्पन्न झाले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 2:23 pm

Web Title: woman murdered her daughter and suicide herself in palghar nck 90
Next Stories
1 केशकर्तनालये, ब्यूटीपार्लर रविवारपासून सुरू; पण पाळावे लागणार ‘हे’ नियम
2 चिनी वस्तू वापराव्या की नाही याबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावे : सतेज पाटील
3 “भाजपाच्या आमदाराला हात जरी लावला तरी…,” पडळकरांवरुन निलेश राणेंचं आव्हान
Just Now!
X