21 October 2020

News Flash

ताडगाव जंगलात चकमकीत जहाल नक्षलवादी सरिता ठार

नक्षलवादी व पोलिसांत झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी व पेरीमिली दलमची उपकमांडर सरिता ठार झाली.

भामरागडच्या पोमके ताडगाव हद्दीत मौजा बांदेनगर जंगल परिसरात ताडगाव पोलीस पथक नक्षलविरोधी अभियान राबवत असताना आज दुपारी बांदेनगर जंगलात नक्षलवादी व पोलिसांत झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी व पेरीमिली दलमची उपकमांडर सरिता ठार झाली.
बांदेनगर जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. ताडगाव पोलीस पथकाने चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे नक्षलवादी जंगलात पळून गेले. दरम्यान, या चकमकीनंतर घटनास्थळी जहाल नक्षलवादी सरिताचा मृतदेह दिसून आला, तसेच घटनास्थळावरून एक एसएलआर, दारूगोळा व इतर नक्षली साहित्य जप्त करण्यात आले. या जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. सरिता ही कुख्यात नक्षलवादी साईनाथ याची पत्नी आहे. तिच्यावर ६ लाखांचे बक्षीस असून १५ ते २० गुन्ह्य़ांत तिचा सहभाग होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 1:27 am

Web Title: woman naxal sarita killed in encounter in gadchiroli
Next Stories
1 मुरुडमध्ये समुद्रात विद्यार्थी बुडल्याप्रकरणी संस्थाचालक, शिक्षकांवर गुन्हा
2 पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी!
3 जलसंधारणासाठी श्रमदानाची आमिरची इच्छा
Just Now!
X