News Flash

महिला पोलिसावर पोलिसाचाच बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून पोलीस शिपायाने आपल्याच सहकारी महिला पोलिसावर दोन वष्रे बलात्कार केला. या प्रकरणी या पीडित महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली

| June 29, 2014 03:17 am

लग्नाचे आमिष दाखवून पोलीस शिपायाने आपल्याच सहकारी महिला पोलिसावर दोन वष्रे बलात्कार केला. या प्रकरणी या पीडित महिलेने  अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी नागेश पोपट गावडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पीडित महिला पोलीस शिपाई २०१२मध्ये रायगड पोलीस दलामध्ये शिपाई पदावर भरती झाली. या भारतीच्या कालावधीत त्यांना प्रशिक्षण देणारे नागेश पोपट गावडे यांच्याशी तिची ओळख झाली. तिला मदत करण्याच्या बहाण्याने गावडे याने तिच्याशी जवळीक साधली. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. या वेळी त्याने चित्रीकरण करून ते मोबाइलमध्ये ठेवले. बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. सातारा येथे गावडे याने या पीडित महिलेला मारहाणही केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2014 3:17 am

Web Title: woman police constable raped by colleague police constable
टॅग : Police Constable
Next Stories
1 स्पर्धेत टिकण्यासाठी एसटीला सरकार नियंत्रण मुक्त करावे
2 मसापची पंचवार्षिक निवडणूक
3 कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना धमकी देणाऱ्यास अटक
Just Now!
X