News Flash

तीन मुलींसह महिलेची आत्महत्या

सेलू तालुक्यातील कानड शिवारात महिलेने आपल्या तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. शुक्रवारपासून या चौघी बेपत्ता होत्या.

| April 21, 2013 03:15 am

सेलू तालुक्यातील कानड शिवारात महिलेने आपल्या तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. शुक्रवारपासून या चौघी बेपत्ता होत्या.
सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील सोमनाथ भोसले हे पत्नी शोभा व तीन मुलींसह बोरी परिसरातील मारवाडी शिवारात शुक्रवारी शेळ्या चारण्यास गेले होते. दुपारी तीन वाजता शोभा भोसले व जया (वय ५), सोमत्री (वय ३), पूनम (वय १) या तीन मुलींना घेऊन गावाकडे जाण्यासाठी निघाल्या. परंतु शोभा घरी परतली नसल्याचे सायंकाळी सोमनाथ भोसले घरी परतल्यानंतर लक्षात आले. पत्नीसह मुलींचा कानड व मारवाडी शिवारात रात्रभर शोध घेऊनही काही पत्ता लागला नाही. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास कानड शिवारातील विहिरीत शोभा व मुलींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. या बाबत बोरी पोलीस  पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. बोरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. शोभा हिने लहान मुलींसह केलेल्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी बोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 3:15 am

Web Title: woman suicide with three daughters
Next Stories
1 येवल्यात गारांचा सडा
2 भारनियमनाला उतारा : सौरऊर्जेवर पेट्रोल पंप!
3 काळोख दाटुनी येणार..
Just Now!
X