11 December 2017

News Flash

मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न; महिलेसह दोघांना अटक

पोलिसांनी सुजितकुमार लोहार याच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

वार्ताहर, जालना | Updated: October 2, 2017 12:38 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी सुजितकुमार मोतीलालजी लोहार याच्यासह एका महिलेला जालना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपी सुजितकुमार याचा विचार मुलीची विक्री करण्याचा असल्याची माहिती पुढे येत आहे. सुजितकुमार हा राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्य़ातील खेडवाडा तालुक्यामधील वृषभदेव येथील रहिवासी आहे. पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला महाराष्ट्रातील औरंगाबाद, पुणे व राजस्थानात नेऊन तिची विक्री करण्याचा प्रयत्न सुजितकुमारने केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सुजितकुमार लोहार याच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

जालना पोलिसांनी पीडित मुलीला ताब्यात घेतले असून येथील एका महिलेसही अटक करण्यात आली असून तिला आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. राज्यात मुली विक्री करण्याचा टोळीचा तपास जालना पोलीस करीत आहेत. पकडलेल्या आरोपींची चौकशी करून या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

First Published on October 2, 2017 12:38 am

Web Title: woman with two more arrested in human trafficking of girl