शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाण्यापासून कोणालाही रोखणार नाही. सर्वांना प्रवेश देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतला आहे. या निर्णयाचे संपूर्ण राज्यात स्वागत करण्यात येत असून, यापुढे पुरुष किंवा महिला असा भेदाभेद न करता कोणलाही शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन अभिषेक करता येणार आहे. विश्वस्त समितीच्या अध्यक्ष अनिता शेटे आणि इतर सर्व विश्वस्तांनी एकमताने हा निर्णय घेतला.
देव पहाया कारणे
गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवारी ग्रामस्थानी चौथऱयावर जाऊन शनिदेवाला जलाभिषेक घातल्यानंतर विश्वस्तांनी यापुढे कोणालाही चौथऱयावर जाण्यापासून रोखणार नसल्याचे स्पष्ट केले. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
महिलांना मंदिर प्रवेश हा मूलभूत अधिकार!
आतापर्यंत शनिशिंगणापूर येथील मंदिरात केवळ पुरुषांनाच शनी चौथऱयावर प्रवेश दिला जात होता. पण काही महिन्यांपूर्वी एका महिलेने सुरक्षा भेदून चौथऱ्यावर प्रवेश केल्यानंतर मंदिरात महिलांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीचा विषय चर्चेला आला. केवळ महिलांनाच प्रवेश का नाही, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अन्यायाविरोधात आंदोलन छेडले होते. त्यावेळी त्यांनाही मंदिरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले होते.
शनी मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाचा मार्ग मोकळा, हायकोर्टाचे आदेश
हा संपूर्ण विषय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि इतरांनी याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयात नेला. न्यायालयानेही मंदिरात प्रवेश करण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही. त्याचबरोबर लिंगभेदही करता येणार नाही, असे स्पष्ट करीत सरकारला यामध्ये लक्ष घालण्याचे आणि महिलांना प्रवेश करण्यापासून कोणीही रोखणार नाही, याची व्यवस्था लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही गेल्या शनिवारी शनिशिंगणापूरमध्ये मोठा गोंधळ उडाला. शनी चौथऱयावर जाऊ पाहणाऱ्या तृप्ती देसाई आणि इतर महिलांना धक्काबुक्की करण्यात आली होती. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी सुरक्षेमध्ये तृप्ती देसाई यांना घटनास्थळावरून बाजूला नेले होते.
शनीच्या उपग्रहावर दहा हजार फुट उंचीचा पर्वत