News Flash

ताडोबात व्याघ्रदर्शनासाठी आता महिला मार्गदर्शकही!

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना व्याघ्रदर्शन घडविणारी सहा महिला गाईडस्ची पहिली तुकडी दाखल झाली आहे.

| March 8, 2015 04:58 am

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना व्याघ्रदर्शन घडविणारी सहा महिला गाईडस्ची पहिली तुकडी दाखल झाली आहे. राज्यातील चार व्याघ्र प्रकल्पात प्रथमच महिला गाईडचा यशस्वी प्रयोग ताडोबात झाला  आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ात शहरापासून ४५ कि.मी. अंतरावर पट्टेदार वाघांसाठी देशविदेशात प्रसिध्द असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. ६२५.०४ चौ.कि.मी क्षेत्रात पसरलेला हा विस्तीर्ण व्याघ्र प्रकल्प म्हणजे मध्य भारतातील निसर्ग, घनदाट अरण्य आणि वन्यजीवांचे अव्दितीय आश्रयस्थळ आहे.
 राज्यात मेळघाट, सहय़ाद्री, पेंच व ताडोबा, असे चार व्याघ्र प्रकल्प असून यापैकी ताडोबात जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर पर्यटकांना व्याघ्रदर्शन घडविणारी सहा महिला गाईडस्ची तुकडी दाखल झाली आहे. यात शहनाज बेग, गायत्री वाढई, काजल निकोडे, माया जेंगढे, भावना वाढई यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 4:58 am

Web Title: women guids in tadoba
Next Stories
1 काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा ‘राष्ट्रवादी’समोर मैत्रीचा ‘हात’!
2 सरकारच्या नाकर्तेपणाचा जाब विचारणार
3 शहांची सरसंघचालकांशी ९ तास चर्चा
Just Now!
X