माथेरान येथे एको पॉइंट परिसरात घोडय़ावरून पडून महिला पर्यटक गंभिररीत्या जखमी झाली. अत्यावस्थ स्थितीत तिला उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले. ही बाब लक्षात घेऊन आता घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. शनिवारी एको पॉइंट परिसरात ही घटना घडली. घोडय़ावरून पडलेल्या आणि गंभिररीत्या जखमी झालेल्या महिलेला सुरुवातीला पनवेलच्या लाइफ लाइन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र नंतर तिच्या मेंदूतील रक्तस्राव थांबत नसल्याने अत्यवस्थ स्थितीत मुंबई येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालणे सक्तीचे केले पाहिजे अशी मागणी माथेरान येथील सामाजिक कार्यकत्रे सुनील िशदे यांनी केली आहे. गेल्या वर्षीदेखील इंग्लंडहून आलेली सात वर्षांची मुलगी इंडियामेहू या घोडय़ावरून पडून जागीच मृत्यू झाला होता. घोडा एक साहसी खेळाचे प्रतीक आहे. माथेरानला वाहनबंदी कायद्यामुळे लहान मुले, महिला सर्वाना घोडय़ावरून प्रवास करावा लागतो. अथवा माणसाने ओढल्या जाणाऱ्या हातरिक्षांचा वापर करावा लागतो. नाही तर पायपीट करावी लागते. त्यामुळे माथेरानमध्ये सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूकीची संसाधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ई-रिक्षा हा त्यासाठी चांगला पर्याय ठरू शकेल, असा विश्वास सुनील िशदे यांनी व्यक्त केला. या संदर्भातील प्रस्ताव शासनकडे पाठवण्यात आला असून त्यावर निर्णय प्रलंबित आहे. माथेरान येथे झालेली ही घटना लक्षात घेऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.