20 September 2018

News Flash

प्रियकराच्या मदतीने काढला दिव्यांग पतीचा काटा, दोन महिन्यांनी फुटली वाचा

फिरोजाबानो शकील कुरेशी (वय ३९) या महिलेसह तिचा प्रियकर मोहम्मद एझाज कुरेशी (वय २९) आणि साथीदार इम्रानोद्दीन सय्यद (वय ४२) या तिघांना अटक केली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या दिव्यांग पतीची महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची घटना यवतमाळमध्ये घडली. जवळपास दोन महिन्यांनंतर महिलेनेच पतीची हत्या केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी फिरोजाबानो शकील कुरेशी (वय ३९) या महिलेसह तिचा प्रियकर मोहम्मद एझाज कुरेशी (वय २९) आणि साथीदार इम्रानोद्दीन सय्यद (वय ४२) या तिघांना अटक केली आहे.

HOT DEALS
  • Sony Xperia XZs G8232 64 GB (Warm Silver)
    ₹ 34999 MRP ₹ 51990 -33%
    ₹3500 Cashback
  • jivi energy E12 8GB (black)
    ₹ 2799 MRP ₹ 4899 -43%
    ₹280 Cashback

मार्च महिन्यात यवतमाळमधील कळंब चौक – नागपूर रोडवरील एका गोदामाजवळ शेख रशिद कुरेशी (वय ४०) या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. रशिदच्या पत्नीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत पतीला अज्ञात ट्रक चालकाने उडवल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता.

काही दिवसांपूर्वी यवतमाळमधील गुन्हे शाखेच्या पथकाला रशिद कुरेशी या व्यक्तीची हत्या झाली होती, अशी माहिती मिळाली. यानंतर गुन्हे शाखेने या घटनेचा पुन्हा तपास सुरु केला. रशिदच्या पुतण्यानेही हत्येचा संशय व्यक्त केला. पोलीस तपासात मोहम्मद एझाजनेच हत्या केल्याचे समोर आले. मोहम्मदने दगडाने ठेचून त्याची हत्या केली. या कामात त्याला इम्रानोद्दीनने साथ दिली. फिरोजाबानोशी अनैतिक संबंध होते आणि तिच्या सांगण्यावरुनच ही हत्या केली, अशी कबुली आरोपींनी दिले. यानंतर पोलिसांनी फिरोजाबानोलाही अटक केली. रशिद हा दिव्यांग होता आणि त्याला दारुचे व्यसन असल्याने त्याचे पत्नीशी वाद व्हायचे. यातूनच तिने पतीची हत्या केल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले.

First Published on July 12, 2018 6:08 pm

Web Title: women kills husband with the help of boyfriend in yavatmal