12 July 2020

News Flash

महिलेच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

महिलेचा निर्घृण खून करण्यात आला होता.

प्रतिनिधिक छायाचित्र

वर्धा : पैश्याचा वादातून महिलेचा खून केल्याप्रकरणी आरोपी कवीश शंकरराव क्षीरसागर नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

विशेष सत्र न्यायाधीश मृदुला भाटीया यांनी हा निकाल दिला. या शिक्षेसोबतच दंड ठोठावण्यात आला असून दंडाच्या रकमेपैकी एक लाख रुपये मृताच्या मुलींना व २५ हजार रुपये मृताच्या बहिणीला देण्याचे आदेश देण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत गजानन नगर येथील राहणाऱ्या संगीता अनिल परसराम या महिलेचा निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी संगीताची बहीण ममता हिने तक्रार केली होती. संगीता व आरोपी यांचे घरगुती संबंध होते. त्यातूनच आरोपीने मृत महिलेच्या पतीस कर्ज दिले होते. रक्कम परत न केल्याने आरोपी नेहमी महिलेला त्रास द्यायचा. विविध मागण्या करायचा. नेहमीच घडणाऱ्या अशा वादातून घटनेच्या आधी महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्नदेखील केला होता. उपचारानंतर ती दवाखान्यातून आपली बहीण ममतासोबत घरी आली. त्याच दिवशी आरोपी कवीशने सोबत आणलेल्या चाकूने महिलेला जखमी केले. तिला वाचवण्यासाठी बहीण मधात पडल्यावर तिलादेखील भोसकण्यात आले. तसेच घरातच असणारा मोठा दगड महिलेच्या डोक्यावर मारण्यात आला. हा खून झाला. त्यावेळी मृत महिलेची बहीण तसेच परिसरातील लोकं उपस्थित होते. एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. शासनातर्फे  अ‍ॅड. जी.व्ही. तकवाले यांनी काम पाहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:15 am

Web Title: women murder criminal life convict akp 94
Next Stories
1 शिकारीमुळे खवले माजरांची ८० टक्के संख्या कमी
2 समाजाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांची -पवार
3 घरात त्रास देणाऱ्या मुलाचा सोलापुरात सुपारी देऊन खून
Just Now!
X