29 September 2020

News Flash

महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, भाजपा आमदारासह शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल

बांधकाम किट वितरण प्रसंगी महिला पोलीस निरीक्षकासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

(भाजपा आमदार - चरण वाघमारे, छायाचित्र सौजन्य - फेसबुक)

महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणात भाजपाचे आमदार चरण वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा क्षेत्राचे ते आमदार आहेत. वाघमारे यांच्यासह भाजपाच्या शहराध्यक्षांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम किट वितरण प्रसंगी महिला पोलीस निरीक्षकासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

काय आहे आरोप –
१६ सप्टेंबर रोजी तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांना सुरक्षा किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. किट वाटपासाठी मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष बांधकाम कामगार एकत्र जमले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून तुमसर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक तैनात होत्या. गर्दीमुळे गोंधळ होऊ नये म्हणून महिला व पुरुषांची स्वतंत्र रांग लावण्यात आली होती. त्या दरम्यान महिलांच्या रांगेत असलेल्या एका गरोदर महिलेला त्रास झाला. त्या महिलेशी पोलीस उपनिरीक्षक बोलत असताना भाजपाचे शहर अध्यक्ष अनील जिभकाटे तिथे आले. त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा एकेरी उल्लेख करुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यावेळी आमदार चरण वाघमारेही तेथे उपस्थित होते. मात्र आमदारांनी हा प्रकार थांबवण्याऐवजी आपली खिल्ली उडवून अपमान केला, अशी तक्रार संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षकांनी तुमसर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या प्रकरणी तुमसर पोलीस स्टेशनमध्ये आमदार चरण वाघमारे यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष अनील जिभकाटे यांच्याविरुद्ध भा. दं. वि. ३५३, ३५४, २९४, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन आमदार वाघमारे यांनी तुमसर पोलीस स्टेशनमध्ये दिल्याची माहिती आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 11:17 am

Web Title: women police officer molestation case bjp mla charan waghmare sas 89
Next Stories
1 भाजपाकडून शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न; धनंजय मुंडे यांचा आरोप
2 युतीबद्दल बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही; गिरीश महाजन यांचा रावतेंना टोला
3 उद्धव ठाकरे यांच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यावर हसावे की रडावे हेच कळेना : सचिन सावंत
Just Now!
X