18 February 2020

News Flash

महिला पोलिसावर बलात्कार; साताऱ्यात पोलिसाविरुद्ध गुन्हा

मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्याला पोलिस कोठडी दिली.

 

वाई : येथील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याबद्दल पोलीस मुख्यालयातीलच अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय सतीश कांबळे (मूळ रा.भरतगाव, ता.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पीडित पोलीस कर्मचारी आणि संशयिताची ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेऊन लग्नाचे आमिष दाखवत त्याने शरीरसंबंध ठेवले होते.

तसेच संशयिताच्या मोठय़ा बहिणीच्या लग्नाकरिता तक्रारदार महिला पोलिसाकडून त्याने ५० हजार रुपये देखील घेतले. मात्र संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर संशयित त्याबाबत टाळाटाळ करू लागला.

उसने पैसे देण्यासही संशयिताने टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार महिला पोलीस कर्मचाऱ्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यानुसार पोलिस कांबळे याच्याविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्याला पोलिस कोठडी दिली.

First Published on January 23, 2020 2:24 am

Web Title: women police rape satara police arrest crime akp 94
Next Stories
1 कृषी कर्मचारी खूनप्रकरणात मुलासह पत्नीचाही सहभाग
2 तेलसर्वेक्षणाच्या सवलतीला विरोध
3 मोखाडय़ात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आत्महत्या
Just Now!
X