News Flash

महिलांना लोकल प्रवास करू द्यावा, राज्य सरकारची रेल्वे बोर्डाला पुन्हा विनंती

रेल्वे बोर्डाकडून अद्याप निर्णय नाहीच

महिलांना लोकलचा प्रवास करु द्यावा यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र लिहिलं आहे. नवरात्राच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी राज्य सरकारने सरसकट सगळ्या महिलांना लोकल प्रवासाला संमती दिल्याचं म्हटलं होतं. मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली. मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रवासाचा पेच सुटला असं वाटत असतानाच तो जैसे थेच राहिला. अशात आता राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला विनंती करणारं पत्र पाठवलं आहे. मात्र रेल्वे बोर्डाने याबबत निर्णय घेतलेला नाही.

 

 

पुन्हा एकदा राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवास करु द्यावा असं या पत्रात म्हटलं आहे. सध्याच्या घडीला फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे.

हे पण वाचा– “महिलांच्या लोकल प्रवासासाठी भाजपाचा घंटानाद का नाही?”

शुक्रवारी संध्याकाळी ठाकरे सरकारने सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवासासाठी १७ ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मुभा दिली होती. मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली. त्यामुळे सरसकट महिलांना लोकलचा प्रवास करता आलाच नाही. यावरुन काँग्रेसने भाजपावर आरोप केले आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला महिलांसाठी रेल्वे सुरु करावीशी वाटत नाही. त्यांना यामागे राजकारण करायचं आहे असा आरोप केला होता. तसंच मंदिरं उघडण्यासाठी घंटानाद करणारे भाजपा नेते हे आता महिलांसाठी लोकल सुरु व्हावी म्हणून घंटानाद का करत नाहीत असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी विचारला होता. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा सरसकट सर्व महिलांसाठी लोकल सुरु करा असं पत्र राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला लिहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 2:17 pm

Web Title: women should be allowed to travel by local state government another appeal to railway board scj 81
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करु नये म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…
2 “उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसारखा दौरा करु नये”
3 ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील करोना चाचण्यांमध्ये १८ टक्क्यांनी घट
Just Now!
X