News Flash

‘घरातील महिलांच्या कर्तृत्वाला संधी द्या’

पुरुष फक्त नोकरी करतात. महिलांना मात्र नोकरीबरोबरच इतर भुमिकाही बजावाव्या लागतात.

पुरुष फक्त नोकरी करतात. महिलांना मात्र नोकरीबरोबरच इतर भुमिकाही बजावाव्या लागतात. व्यवसाय करीत असताना संसारही मी सांभाळते. मला माझ्या कुटुंबियांकडून चांगला पाठींबा मिळत असल्याने या व्यवसायामार्फत उंची गाठता आली. त्यामुळे पुरुषांनी घरातील महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम करावे, असा संदेश वीणा वर्ल्डच्या संचालिका वीणा पाटील यांनी दिला.
त्या अलिबाग नगरपरिषद व पीएनपी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कला महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुख्य संघटक महिला आघाडी प्रमुख शर्मिला ठाकरे, माजी नगराध्यक्षा सुनिता नाईक, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी एज्यूकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना वीणा पाटील यांनी सांगितले, वीणा ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मी अनेकांना जग प्रवास घडवत असली तरी, मात्र गेटवे ते मांडवा हा सागरी प्रवास करण्याची संधी संधी मला पहिल्यांदा मिळाली. या निमित्ताने कोकण पर्यटनाचा आनंद लुटता आला. आगामी काळात कोकणातील अशाच काही ठिकाणांसाठी टुर काढण्याचे प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुख्य संघटक शर्मिला ठाकरे यांनी सांगितले, प्रत्येक दिवस महिलेचा असतो. कला महोत्सवासारखे दिवस दर महिन्याला घेतले पाहिजेत. जेणेकरून महिलांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्यास वेळ मिळेल. प्रत्येक महिलेला आपला स्वतचा अभिमान असायला पाहिजे. मनात आले तर स्त्रिया काहीही करू शकतात. देवानेही जन्म देण्यासाठी आपली निवड केली आहे. तेथेच आपले श्रेष्ठत्व निर्माण होते, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कला महोत्सव, रांगोळी स्पर्धा व पाककला स्पध्रेचे उद्घाटन शर्मिला ठाकरे व वीणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गोळा फेकमध्ये विभाग पातळीवर निवड झालेल्या रेणूका शंकर पवार, बेस्ट ड्रामेबाजमध्ये बेस्ट अ‍ॅक्ट ऑफ सिरीज अ‍ॅवॉड मिळाल्याबद्दल सई कांबळे, राज्य घटनेची ३९५ कलमे, उपकलमे इंग्रजीमध्ये तोंडपाठ करणारी मनश्री आंबेतकर, डान्स इंडिया डान्समध्ये फायनलपर्यंत पोहचलेली प्रणाली म्हात्रे, कॉस्च्यूम डिझायनर सनई नागवेकर या गुणवंत महिलांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीएनपी एज्यूकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, सुत्रसंचालन डॉ. प्रिती प्रधान यांनी केले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 12:32 am

Web Title: womens day celebration in sawantwadi
Next Stories
1 जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या बदलीला पालकमंत्र्यांचा नकार
2 डंपर आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सिंधुदुर्गात मनाई आदेश
3 बफर झोनमध्ये येण्यास ३३ गावे तयार
Just Now!
X