राज्य सरकारकडील कर्मचाऱ्यांना कामासंबंधी गांभीर्य नाही. काम उरकणे आणि पाटय़ा टाकण्याची वृत्ती जास्त असल्याचे मत ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
एका स्थानिक कार्यक्रमासाठी पाटील येथे आले होते. या वेळी ते बोलत होते. माझ्याकडे मंत्रिमंडळातील महत्त्वाची चार खाती आहेत. या सर्व विभागांत मिळून वीस हजार कर्मचारी काम करतात, परंतु मला समाजाभिमुख काम करण्यासाठी चांगले वीस कर्मचारी या विभागातून मिळत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्यासमोर आलेल्या विषयाचे गांभीर्य नसणे, आपल्या कामाशी निष्ठा नसणे, पाटय़ा टाकणे आणि काम उरकणे असे धोरण सरकारी कर्मचाऱ्यांचे झाले आहे. आता सरकार बदलले आहे. सरकारप्रमाणे काम करायचा बदल यांच्यात दिसून येत नाहीत. त्यांच्या कामात कौशल्य दिसत नसल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली.