22 January 2021

News Flash

भारतीय संघाच्या भगव्या जर्सीमागे नरेंद्र मोदींचा हात, अबू आझमींचा आरोप

'नरेंद्र मोदी भारतीय संघाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत'

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीत बदल करण्यात आला असून इंग्लंडविरोधीतील सामन्यात भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. निळ्या रंगाची जर्सी वापरणारा भारतीय संघ भगव्या जर्सीत दिसणार आहे. दोन्ही संघाच्या जर्सीचा रंग निळा असल्याने हा बदल करण्यात आला आहे. मात्र यावरुन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोषी धरत भारतीय संघाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

अबू आझमी यांनी म्हटलं आहे की, ‘भारतीय संघ ज्याप्रकारे कामगिरी करत आहे त्याची प्रशंसा आहे. पण मोदी सरकार देशाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात कोणताही विकास केला नाही, बेरोजगारी वाढत चालली आहे, महागाई वाढली आहे, डॉलरचा भावही वाढत आहे. लोकांनी अशा परिस्थितीत मोदींना निवडून दिलं याचं आश्चर्य वाटत आहे’.

पुढे त्यांनी म्हटलं आहेत की, ‘एका मुस्लिम व्यक्तीने भारतीय झेंड्याला रंग दिला होता हे विसरु नये. जर संघाला एखादा रंग द्यायचा असेल तर तो तिरंग्याचा द्यायला हवा. भगवा रंग देणं चुकीचं आहे. जनेतेने याचा विरोध केला पाहिजे’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 5:22 pm

Web Title: world cup 2019 indian cricket team orange jersey sp leader abu azmi agy 87
Next Stories
1 शिवाजी महाराजांच्या पावलावर जगणारा समाज तयार करायचा आहे – संभाजी भिडे गुरुजी
2 कातिल सिद्दीकी खून प्रकरण: शरद मोहोळ, अलोक भालेराव निर्दोष
3 चार वर्षात घेतलेले कर्ज सरकारने कशासाठी वापरले याची श्वेतपत्रिका काढा – धनंजय मुंडे
Just Now!
X