ढासळत चाललेले पर्यावरण आणि निसर्गाचा असमतोल यामुळे निसर्गातील बदलाची जाणीव करून देणारे पक्षी धोक्यात आले आहेत. देशातील धोक्यात असलेल्या पक्ष्यांच्या जातीत वाढ झाली असून निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेने (आययूसीएन-इंटरनॅशनल युनियन कन्झर्वेशन ऑफ नेचर) जाहीर केलेल्या यादीत देशातील आठ पक्ष्यांच्या जाती धोक्यात असल्याचे नमूद केले आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि लंडन येथील बर्डलाईफ इंटरनॅशनलच्यावतीने या पक्ष्यांच्या संदर्भात अभ्यास करण्यात येतो. दरवर्षी धोक्यात, अतिशय धोक्यात, संकटग्रस्त, अतिशय संकटग्रस्त, नामशेष पक्ष्यांची यादी आययूसीएनच्यावतीने लाल यादी म्हणून जाहीर केली जाते. २०१४च्या जाहीर करण्यात आलेल्या यादीत तब्बल आठ पक्ष्यांच्या जाती धोक्यात असल्याचे स्पष्ट केले आहे. ईशान्य भारतातील बुगुन लिओचीचला या पक्ष्यासह पांढऱ्या मानेचा करकोचा, अंदमानातील बदक, अंदमानातील कबूतर, राखाडी मानेचा कबूतर, लाल मानेचा ससाणा, हिमालयीन जीफॉन, बीअर्डेड वल्चर, युनान नुतात्त्व या पक्ष्यांचा समावेश आहे. आययूसीएनच्या यापूर्वी २०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या भारतातील पाच पक्ष्यांच्या जाती धोक्यात होत्या. ग्रेट स्टोन प्लोवर, अलेक्झांड्रीन पॅराकीट, ग्रे हेडेड पॅराकिट, ब्लॉसम हेडेड पॅराकीट, रेड ब्रिस्टेड पॅराकिटचा समावेश होता. बुगून लिओचिला हा लहान आकाराचा पक्षी अरुणाचल प्रदेशातील काही भागात तसेच भूतान आणि चीनमध्ये आढळतो. भारतातील सर्वच भागात आढळणारा पांढऱ्या मानेचा करकोचा वेगाने कमी होत आहे. अंदमानातील बदक हा फक्त ग्रेट काको आयलंड आणि अंदमान बेटांवरच आढळतो. त्याशिवाय अंदमानातील कबूतर हासुद्धा अंदमानसाठीच प्रदेशनिष्ठ आहे. राखाडी मानेचा कबूतर हा फक्त ईशान्य भारतात दिसून येतो. लाल डोक्याच्या ससाण्याची संपूर्ण देशातील संख्या घटत चालली आहे. हिमालयीन जीफॉन हा सुद्धा फक्त हिमालयातच आढळतो.
जनावरांच्या औषधात डायक्लोफिनॅकच्या वापरामुळे जनावरांचे मृतदेह खाणाऱ्या या पक्ष्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. बीअर्डेड वल्चरसुद्धा फक्त हिमालयातच आढळून येतो. युनान नुतात्त्व हा पक्षी फक्त अरुणाची प्रदेशात आढळतो. हे पक्षी निसर्गाच्या सुदृढतेचे लक्षण समजले जातात. अधिवास नष्ट होत असल्याने पक्ष्यांच्या विविध जाती धोक्यात येत आहेत.
२०१४च्या बर्डलाईफमध्ये १० हजार ४२५ पक्ष्यांचा समावेश होता. त्यापैकी १४० प्रजाती धोक्यात, ४ जंगलातील पक्ष्यांच्या प्रजाती धोक्यात, २१३ अत्यंत संकटग्रस्त, ७४१ मृत आहेत.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा