News Flash

‘जगातील पहिल्या वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा शोध’

अमेरिकेतील संशोधक योगेश चुकेवाड व त्यांच्या चमूने नुकताच युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये जगातील सर्वात लहान वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा शोध लावला आहे.

मूळच्या नांदेडच्या संशोधकाकडून उद्या सादरीकरण

अमेरिकेतील संशोधक योगेश चुकेवाड व त्यांच्या चमूने नुकताच युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये जगातील सर्वात लहान वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा शोध लावला आहे. ज्याचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन १९० मिलिग्राम आहे. दिसायला किटका सारखा असून याचे प्रक्षेपण किरो-७ या अमेरिकन टीव्हीवरून दाखवण्यात आले आहे.  हे संशोधक उद्या (बुधवारी) ब्रिसबेन येथे ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रोबोटिक्स अ‍ॅण्ड ऑटोमेशन’मध्ये हा शोध सादर करणार आहेत.

संशोधक योगेश चुकेवाड हे भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी तथा ज्येष्ठ बालसाहित्यिक माधव चुकेवाड यांचे चिरंजीव आहेत. योगेशचे शिक्षण महात्मा फुले विद्यालय येथे झाले. त्यांनी आयआयटी-पवई (मुंबई) येथे बी. टेक., तर अमेरिकेत एम. एस. केले. आता ते युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिग्टनमध्ये पीएच.डी. करत आहेत.

या संशोधनाबद्दल याच विद्यापीठाचे संगणकशास्त्र विभागाचे डॉ. श्याम गोडलाकोटा म्हणतात की, या रोबोसाठी एक लहान ‘ऑन बोर्ड’ सíकट वापरले आहे. या सर्टमधील फोटोव्होडटाइक लेसरच्या साह्यने पंखांना वीजपुरवठा करते. रोबोच्या वजनात भर न पडता वीजपुरवठा करण्याचा हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. यापूर्वी असा वायरलेस रोबो कीटक केवळ स्वप्न समजला जायचा. आमच्या या रोबोने या कल्पनेला सत्यात उतरवले आहे, असे अभियांत्रिकी विभागाच्या डॉ. सॉयर फुलर यांनी सांगितले.

योहानेस जेम्स व विक्रम अय्यर या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार सíकटवरचा मायक्रोकंट्रोलर त्या रोबोच्या मेंदूसारखा असतो. तो त्याला कुठले पंख किती वेगात फडफडावयाचे याबाबत संदेश देतो. संशोधक योगेश चुकेवाड म्हणतात, अवघड मार्गातून स्वत:हून आपली वाट शोधण्याची क्षमता रोबोफ्लायमध्ये असावी, असा आमचा प्रयत्न आहे. याचा उपयोग गॅस लिक व पिकाची देखभाल करण्यासाठी होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 3:32 am

Web Title: world first wireless flying robot
Next Stories
1 कोकणात राजकीय हिशेब चुकते करण्याची संधी
2 शिवसेना-भाजप संघर्ष राष्ट्रवादीच्या पथ्यावर?
3 भाजप किती मते फोडणार याचीच उत्सुकता!
Just Now!
X