एखाद्या अंगरख्याचा पायघोळ असतोच किती? लोककलावंतांपैकी काहींना हा प्रश्न विचाराल तर जांभूळ आख्यान या प्रसिद्ध लोकनाटय़ात नंदेश उमप यांनी वापरलेल्या ५० मीटरच्या पायघोळाचे वर्णन कोणीतरी करेल. पायघोळाबरोबरची गिरकी याचे लोककलाकारांच्या जगात मोठे कौतुक असते. त्यांच्याच का, तशी गिरकी बघताना कोणत्याही रसिकाच्या तोंडून वाहव्वाच निघेल. औरंगाबादच्या निरंजन भाकरे यांनी ९० मीटर कापडाचा पायघोळ तयार करून घेतलेली गिरकी सध्या चर्चेत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात ७५ मीटर इंच घेर असलेल्या या पायघोळाच्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
राज्यात कोठेही जा, ‘बुरगुंडा होईल बया गं’ असे भारुड ऐकले की, निरंजन भाकरे आठवल्याशिवाय राहत नाहीत. भारुडाला जिवंत ठेवणारा हा गुणी कलावंत नेहमी सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवत असतो.
नुकतेच त्याने सोंगी भारुड लोककलेत मोठा पायघोळ असणारा अंगरखा परिधान केला. तो बनविण्यासाठी १८ हजार रुपये खर्च आला. साडेआठ किलोच्या या पायघोळासह २० किलो वजनाचा जडसांभार अंगावर घेऊन त्यांनी सलग अडीच तास आपली कला सादर केली. गणेश वंदना, वासुदेव, नंदीबैल, कुडबुडय़ा जोशी, भविष्यकार आणि त्यांचे प्रख्यात भारुड या सर्व पात्रांना रसिकांनी भरभरून दाद दिली. पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा आणि रिमिक्सचे अतिक्रमण यामुळे लोककला व लोकसंगीत हरवत चालले आहे. अशा काळात लोकप्रबोधनासह भारतीय कला जपण्याचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!