11 December 2017

News Flash

नंदुरबारमध्ये रंगला आदिवासी समाजाचा सोहळा

शोभा मिरवणुकीद्वारे आदिवासी गौरव दिन साजरा

Updated: August 9, 2017 4:48 PM

दागिने घालून शिबली आणि इतर आदिवासी गाण्यांवर तरुणी देखील थिरकताना दिसल्या.

नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी पारंपारिक पद्धतीने विश्व आदिवासी गौरव दिन साजरा केला. बुधवारी शहरातील पंडित जवाहरलाल नेहरुंच्या पुतळ्यापासून आदिवासी बांधवांनी मुख्य रॅलीला सुरवात केली. यावेळी पारंपारिक वेशभूषेत तरुण आणि तरुणींनी नृत्य देखील सादर केले.

आदिवासी महासंघ, भिलीस्थान टायगर सेना, जय आदिवासी ब्रिगेड, अशा विविध संघटनांनी शहरातून शोभा मिरवणुकीद्वारे आदिवासी गौरव दिन साजरा केला. विशेष म्हणजे या शोभा मिरवणुकीत पारंपारिक पेहराव, दागिने घालून शिबली आणि इतर आदिवासी गाण्यांवर तरुणी देखील थिरकताना दिसल्या. शहरासोबतच संपूर्ण जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या उत्साहाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले.
दुसरीकडे शासकीय आश्रमशाळामध्ये देखील जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहाने साजरा झाला. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी जिल्ह्यात शासकीय सुट्टी जाहीर केली होती.

First Published on August 9, 2017 4:48 pm

Web Title: world tribal glory in nandurbar