नाशिक जिल्ह्यात नव्याने १७ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आलं आहे. यापूर्वी नाशिक आणि मालेगावमध्ये तैनात असलेल्या विविध जिल्ह्यातील तब्बल १०० पोलिसांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर पुन्हा १७ जण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

नाशिकमध्ये बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आलेल्या अद्ययावत माहितीनुसार, करोनाच्या ६३ रुग्णांचे चाचणी अहवाल समोर आले. यापैकी ४८ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या तर १५ जणांच्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये सर्व पोलीस कर्मचारी आहेत. त्याचबरोबर इतर काही प्रलंबित चाचणी अहवालातून दोन राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवान बाधित झाल्याचं समोर आलं.