रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल २३४ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३,६८३ वर पोहोचली आहे. दिवसभरात ११३ जणांनी करोनावर मात केली आहे. तर बुधवारी उपचारांदरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात २३४ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीत १३१, पनवेल ग्रामिणमध्ये ५०, उरणमध्ये ५, खालापूर ७, कर्जत ५, पेण ९, अलिबाग ४, मुरूड २, माणगाव ११, तळा १, रोहा ४, श्रीवर्धन २, महाड १ या रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील चार तर उरणमधील एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ११३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ८,७१६ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ५,००५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ३,६८३ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर २८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. २,१९५ जणांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात सध्या १,३५५ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ६९०, पनवेल ग्रामिण हद्दीतील २९१, उरण ५३, खालापूर ४२, कर्जत ६८, पेण ५०, अलिबाग ५०, मुरुड ८, माणगाव २८, तळा २, रोहा ४८, सुधागड १, श्रीवर्धन ११, महाड ८, पोलादपूरमधील ५ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ७९,१४५ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. करोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे.