News Flash

“टाळेबंदीच्या कालावधीतील गरीबांची वीज बिले त्वरित माफ करा, अन्यथा…”

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा

“देशभरात करोनामुळे २२ मार्च पासून टाळेबंदी आहे. या काळात गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडली. १ एप्रिल पासून या सरकारने वीज दरात वाढ करत जनतेशी बेईमानी केली. ०-१०० या स्लॅब मध्ये सुध्दा वाढ करत राज्यातील जनतेवर अन्याय केला. गरीबांची वीज बिले माफ करावी या मागणीसाठी आम्ही या आंदोलनाचा शंखनाद केला आहे. हा आंदोनलाचा पहिला टप्पा आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे. तसेच सरकारने वीज बिल माफ केले नाही तर आम्ही आंदोलन अधिक तीव्र करु”, असा इशारा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

बल्लारपूर येथे भाजपातर्फे राज्य सरकारच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले, “ज्या जिल्हयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली. त्या जिल्हयात रमाई आवास योजनेसाठी ७५०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र या सरकारने यासाठी आवश्यक ५३ कोटी रुपयांचा निधी अद्याप दिलेला नाही. आपल्या श्रध्दास्थानांची किंमत ज्या सरकारला नाही, त्या सरकारकडून जनता अपेक्षा तरी काय करणार. रमाई आवास योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाकरीता ५३ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने त्वरित द्यावा.”

“आमचे सरकार राज्यात असताना आम्ही कधीही रडत बसलो नाही. या जिल्ह्यासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आपण आदरपूर्वक घेतो. त्यांच्या राजगृह यांच्या निवासस्थानावर दगडफेक करणाऱ्यांना हे सरकार अटक करु शकत नाही. या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. आम्हाला लढाऊ सरकार अपेक्षित आहे, रडणारे सरकार नाही. राज्यात शेतकरी आर्थिकदृष्टया हवालदिल झाला आहे. कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही, गोरगरीब नागरिकांची वीजेची बिले त्वरित माफ केली नाही तर शासनाच्या विरोधात अधिक तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडू”, असे आ. मुनगंटीवार म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 7:13 pm

Web Title: write off electricity bills of the poor during the lockdown period or else ready to face consequences says sudhir mungantiwar vjb 91
Next Stories
1 “…तर तुम्ही शांत बसलेलंच अधिक योग्य राहील”; रोहित पवारांचा भाजपा नेत्याला टोला
2 सोलापुरात कडक संचारबंदी; जनतेचा उत्तम प्रतिसाद
3 “१४ दिवसांच्या विलगीकरणाचा निर्णय मागे घ्या”
Just Now!
X