15 November 2019

News Flash

ज्येष्ठ लेखिका आशा आपराद यांचे निधन

प्रा. डॉ. आशा आपराद यांच्या मागे पती, मुले, नातवंडे असा परिवार आहे.

मुस्लिम समाजाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ लेखिका प्रा. आशा आपराद यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. प्रा. डॉ. आशा आपराद यांच्या मागे पती, मुले, नातवंडे असा परिवार आहे.

मुस्लिम समाज आणि महिलांच्या प्रश्नांवर विपुल लेखन केलेल्या लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. ‘भोगले जे दु:ख त्याला…’, हे त्यांचे आत्मकथन चांगलेच गाजले. त्यांच्या ‘भोगले जे दु:ख त्याला…’ आत्मकथनाचे ‘दर्द जो सहा मैंने…’ असे हिंदी भाषांतरही करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनासह जवळपास १६ पारितोषिके या पुस्तकाला मिळाली आहेत.

आशा आपराद यांचे नाव कोल्हापुरातील सामाजिक वर्तुळात परिचयाचे आहे. आपराद यांनी सुरूवातीला मुस्लिम सत्यशोधक समाज, अंधश्रध्दा निर्मुलन समिती आणि महिला दक्षता समितीच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे.

First Published on August 23, 2019 1:47 pm

Web Title: writer dr asha aaprad passed away nck 90