News Flash

काँग्रेस सचिवपदी आमदार यशोमती ठाकूर

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.

तिवसा मतदारसंघाच्या आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर

कर्नाटक राज्याच्या सहप्रभारी म्हणून नियुक्त

तिवसा मतदारसंघाच्या आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कर्नाटक राज्याच्या सहप्रभारी म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील काँग्रेसजनांनी आनंद व्यक्त केला आहे.

यशोमती ठाकूर यांची यापूर्वी मेघालयात विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक प्रचार आणि पक्षसंघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्याकडे पक्षसंघटनेतील हे महत्त्वाचे पद सोपवल्याचे सांगितले जाते.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये सचिव पदावर काम करतानाच कर्नाटकचे प्रभारी आणि महासचिव के.सी. वेणूगोपाल यांच्यासोबत सहप्रभारी म्हणूनही यशोमती ठाकूर काम पाहणार आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पक्ष पातळीवर अनेक बदल केले जात असून अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली जात आहे.

सलग दोन वेळा तिवसा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या यशोमती ठाकूर अत्यंत धडाडीच्या आमदार म्हणून मानल्या जातात. काँग्रेसच्या विविध आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विदर्भातील त्या एकमेव महिला आमदार आहेत. राष्ट्रीय पातळीवर पक्षकार्य करण्याची संधी या निमित्ताने अलीकडच्या काळात प्रथमच विदर्भाला उपलब्ध झाली आहे.

पक्ष विस्तारासाठी कार्य करणार -ठाकूर

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्यावर पक्षसंघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती म्हणून आपण सदैव काम केले आहे. यापुढेही करणार आहे. पक्षाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करू. कुठलेही पद हे सेवेची एक संधी असते, असे मी मानते. माझे वडील माजी आमदार भयासाहेब ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वाटचाल सुरू आहे. जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, त्यामुळेच पक्षनेतृत्वाने आपली सचिवपदी निवड केली, अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 2:21 am

Web Title: yashomati thakur appointed congress secretary for karnataka ahead of assembly poll
Next Stories
1 अपघातात जखमी झालेल्या दीपालीची मृत्यूशी झुंज अपयशी
2 निधी खर्च करताना अधिकाऱ्यांना रात्रही अपुरी
3 अस्थिव्यंग शाळेतील शिक्षकांना लाभ द्यावेत 
Just Now!
X