आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला वडाची पूजा करत आहेत. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत. याच सणाच्या निमित्ताने यशोमती ठाकूर यांनी दिलेल्या शुभेच्छा देत ट्विट केलं आहे. मी या सावित्रीची उपासक आहे असं म्हणत त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. काय आहे त्यांचं हे ट्विट…कोणाचा आहे हा फोटो? चला पाहूया…

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी वटपौर्णिमेनिमित्ताने ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्याला प्रेरणा देणाऱ्या सावित्रीबद्दल सांगितलं आहे. त्या म्हणतात, “ही सावित्री तुम्हाला अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर काढून तुमच्या मृत बुद्धिला पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य देते. मी या सावित्रीची उपासक आहे.”


या ट्विटसोबतच त्यांनी स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा फोटोही शेअऱ केला आहे. यामध्ये सावित्रीबाईंचा चेहरा जरी दिसत नसला तरी त्यांच्या कपाळावरची चिरी आणि डोक्यावरचा पदर मात्र दिसत आहे. त्यावरुन या सावित्रीबाई फुले आहेत हे कळत आहे.

यशोमती ठाकूर यांचं हे ट्विट आता चांगलंच चर्चेत आलं आहे. अनेकांनी त्यांच्या स्पष्ट भूमिकेबद्दल कौतुक केलं आहे. ही बदलाची सुरुवात आहे असं म्हणत काहींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा- जाणून घ्या : …म्हणून साजरी केली जाते वटपौर्णिमा

वटपौर्णिमेची एक आख्यायिका सांगितली जाते. या कथेच्या मुख्य नायिकेचं नावंही सावित्री आहे. तिने तप करुन तिच्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळवले. त्यावेळी ती वडाच्या झाडाखाली बसली होती, असं मानलं जातं. म्हणून वटपौर्णिमेचा सण महिला साजरा करतात.