यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने तणाव निर्माण झाला. पाच नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले असून आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी आर्णीत गुरुवारी बंदची हाक देण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला.

आर्णीत सातवीत शिकणाऱ्या मुलीवर पाच जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोएन शेख या नराधमाला अटक केली असून उर्वरित आरोपी अजूनही पसार आहेत. शेखला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या घटनेने आर्णीत संतापाची लाट उसळली. सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी आर्णीत बंदची हाक दिली. शहरातील शाळा- महाविद्यालये आणि रुग्णालये बंद ठेवण्यात आली. महामार्गावर टायर जाळून आंदोलकांनी रास्ता रोको देखील केला. आमदार ख्वाजा बेग , माजी आमदार बाळासाहेब माडगूळकर, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, राजू बुटले, विठ्ठल देशमुख, शहा ,नीलेश गायकवाड आदींच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. शहरातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांची माहिती त्यांना देण्यात आली.

shivraj patil chakurkar , shivajirao patil nilangekar
काँग्रेसच्या प्रचारातून चाकुरकर, निलंगेकराचे छायाचित्र गायब
MLA Ganpat Gaikwads wife campaigns against Shinde attends rally with Vaishali Darekar
आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीचा शिंदेंविरोधात प्रचार, वैशाली दरेकरांसोबत रॅलीत सहभागी
kalyan lok sabha marathi news, vaishali darekar latest news in marathi
वैशाली दरेकर : उत्तम वक्त्या आणि आक्रमक चेहरा, कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून महिला उमेदवार रिंगणात
Sunetra Pawar
रायगड : सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला…

नायब तहसीलदार मांडेकर यांना मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले आणि महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सहभागी सर्व आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आली आहे. शहरात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.