11 August 2020

News Flash

यवतमाळ जिल्ह्यत सहा पंचायत समितींमध्ये शिवसेनेची सत्ता

यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, पांढरकवडा आणि कळंब या सहा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे सदस्य निवडून आले.

१० पंचायत समितींमध्ये महिलाराज

यवतमाळ : जिल्ह्यतील १६ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी आज बुधवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा दबदबा कायम राहिला. सहा पंचायत समितींवर शिवसेनेचा भगवा फडकला तर पाच पंचायत समितींवर भाजप तर काँग्रेसने तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन पंचायत समितींवर सत्ता मिळवली. १६ पैकी १० पंचायत समितींची सत्ता आता महिलांच्या हातात आली आहे.

यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, पांढरकवडा आणि कळंब या सहा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे सदस्य निवडून आले. भाजपला वणी, झरी जामणी, घाटंजी, राळेगाव व बाभूळगाव या पाच पंचायत समितींमध्ये तर काँग्रेसला आर्णी, मारेगाव, उमरखेड येथे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पुसद व महागाव पंचायत समितीमध्ये सत्ता मिळाली.

कळंब आणि महागाव येथील आरक्षण सातत्याने महिलांसाठी राखीव निघत असल्याच्या मुद्यावरून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका खारीज करण्यात आल्याने या दोन्ही पंचायत समितींमध्ये निघालेल्या आरक्षणानुसारच सभापतींची निवड करण्यात आली.

आर्णी पंचायत समितीमध्ये आज केवळ उपसभापतींची निवडणूक झाली. येथे सभापती पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी निघाले होते. मात्र या प्रवर्गातील सदस्यच नसल्याने आता नव्याने आरक्षण प्रक्रिया राबवून येथे निवडणूक घेतली जाणार आहे. सध्या येथे काँग्रेसचे सूर्यकांत जयस्वाल यांच्याकडे सभापतीपदाचा प्रभार कायम आहे.

आज झालेल्या निवडणुकीत यवतमाळ पंचायत समिती सभापतीपदी कांता कांबळे (शिवसेना), उपसभापतीपदी उज्ज्वला गावंडे (काँग्रेस), दारव्हा येथे सभापतीपदी सुनीता राऊ त (शिवसेना), उपसभापतीपदी नामदेव जाधव (शिवसेना), पांढरकवडा  सभापती पंकज तोडसाम (शिवसेना), उपसभापती नरेंद्र नंदुरकर (राष्ट्रवादी काँग्रेस), कळंब सभापती पूजा शेळके (शिवसेना), उपसभापती विलास राठोड (काँग्रेस), दिग्रस सभापती अनिता राठोड (शिवसेना), उपसभापती अरविंद गादेवार (शिवसेना), नेर सभापती मधुमती चव्हाण (शिवसेना), उपसभापती रमेश बुरांडे (शिवसेना), उमरखेड सभापती प्रज्ञानंद खडसे (काँग्रेस), उपसभापती विशाखा जाधव (राकॉ), आर्णी सभापती (जुनेच प्रभारी) सूर्यकांत जयस्वाल (काँग्रेस), उपसभापती श्रीकांत राठोड (शिवसेना), मारेगाव सभापती शीतल पोटे (काँग्रेस), उपसभापती संजय आवारी (शिवसेना), महागाव सभापती अनिता चव्हाण (राकाँ),उपसभापती रामचंद्र तंबाखे (शिवसेना), पुसद सभापती छाया हगवणे (राकाँ), उपसभापती भगवान भाकरे (राकाँ), घाटंजी सभापती नीता जाधव (भाजप), उपसभापती सुहास पारवेकर (भाजप), झरी सभापती राजेश्वर गोन्ड्रावार (भाजप), उपसभापती लता आत्राम (भाजप), वणी सभापती संजय पिंपळशेंडे (भाजप), उपसभापती चंद्रज्योती शेंडे (भाकप), राळेगाव सभापती प्रशांत तायडे (भाजप), उपसभापती शीला सलाम (भाजप) आणि बाभूळगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी रोशनी ताडाम (भाजप) तर उपसभापतीपदी सीमा दामेधर (भाजप) यांची निवड झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2020 2:50 am

Web Title: yavatmal district six panchayat samiti shiv sena power apk 94
Next Stories
1 यंदा भारतीय तिळावर संक्रांत
2 जिल्हा परिषदेत भाजपचा धुव्वा
3 सुरक्षा नियमांना तिलांजली देत बेकायदा समुद्रसफरी
Just Now!
X