News Flash

देवदर्शनावरुन परतताना यवतमाळमध्ये अपघात, नववधूसह तीन ठार

हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी चंद्रपूर येथे लग्नानंतर महाकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते.

रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पोलिसांनी खासगी वाहन चालकांना संपर्क करत जखमींना उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

यवतमाळमधील मारेगावजवळ ट्रक आणि कारचा अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नववधूचाही समावेश असून सर्व जण महाकाली देवीचे दर्शन घेऊन परतत होते.

हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी चंद्रपूर येथे लग्नानंतर महाकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतीचा प्रवास करत असताना मारेगाव येथे यवतमाळवरुन चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात दोन जण जागीच ठार झाले. तर उपचारासाठी नेत असताना नववधूचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये लक्ष्मीबाई भारत उपरे (वय ६०), सानिका किसन गोपाळे (वय २०) आणि नववधू साक्षी देविदास उपरे (वय १८) यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास मारेगाव पोलीस करत आहे. जखमींमध्ये राजनंदिनी सुनिल पवार (वय ४) , साधना कोंडबा गोंधरे (वय ३५ ), पूजा शंकर उपरे (वय २०), चंपाबाई बाबा पेंडलेवार (वय ७०) यांचा समावेश आहे.

रुग्णवाहिका उपलब्ध नाही

रात्री मारेगाव पोलीस पेट्रोलिंग करीत होते. अपघात झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी त्वरित १०८ क्रमांकावर संपर्क साधला. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्यांनी लगेच खासगी वाहन चालकांना संपर्क करत जखमींना उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

राज्यात १२ तासांमध्ये अपघातात ९ जणांचा मृत्यू

गेल्या १२ तासांमध्ये राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एकूण ९ जणांचा मृत्यू झाला.  संगमनेरमधील घारगाव येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन जणंना भरधाव कारने धडक दिली. या अपघातात तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला असून अपघातानंतर कारचालक पसार झाला आहे. त्यापूर्वी कोल्हापूरमध्येही कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 11:37 am

Web Title: yavatmal maregaon 3 killed in car truck accident 9 death in last 12 hours in road accident in maharashtra
Next Stories
1 स्मशानभूमीत भावासह दोघांचा खून; अक्कलकोटमध्ये वृध्दाला जन्मठेप
2 सांगलीत १७२ गावे, एक हजार वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा
3 अल्पवयीन मुलाचा खून ; पाहुण्या मुलीची छेड काढतो म्हणून संपवले
Just Now!
X