यवतमाळमधील आर्णी येथील विठ्ठल मंदिर परिसरात बुधवारी दुर्मीळ खवल्या मांजर आढळले. ही माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने हे खवल्या मांजर बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले होते.

त्यानंतर आज गुरुवारी सकाळी या मांजरास आर्णी नजीकच्या जंगलात सुरक्षित ठिकाणी  सोडून देण्यात आले. खवल्या मांजरास ताब्यात घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी रोडगे, वनरक्षक निलेश चव्हाण, एम. के. जाधव, अमोल श्रीनाथ, प्रफुल कोल्हे, दिपक सपकाळे आदिंनी विशेष प्रयत्न केले.

Yavatmal lashed by stormy rain early morning Water in low lying areas
यवतमाळला भल्यापहाटे वादळी पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी
Brutal killing of daughter along with wife in Buldhana
खळबळजनक ! पत्नीसह कन्येची निर्घृण हत्या; मारेकऱ्याने स्वत:ही घेतली विहिरीत उडी…
One crore of fraud with doctor Pretending to find narcotics in an overseas courier
डॉक्टरची एक कोटींची फसवणूक! परदेशातील कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याची बतावणी
Nashik water
निम्म्या नाशिकमध्ये बुधवारी पुन्हा पाणी बंद

खवल्या मांजर हा दुर्मीळ वन्यजीव असून याची तस्करी सुध्दा करण्यात येते. या खवल्या मांजरची किंमत लाखो रुपयात असते, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोडगे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.