06 July 2020

News Flash

पेपरफुटीत बडे मासे?

यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फोडणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली प्रत, तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडील उत्तरपत्रिकेची प्रत तपासून प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. आर्थिक

| November 4, 2014 01:40 am

यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फोडणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली प्रत, तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडील उत्तरपत्रिकेची प्रत तपासून प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी ही माहिती दिली.
या गंभीर गुन्हय़ातील आरोपींवर गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांचे लक्ष होते. विक्रीकर निरीक्षक मकरंद मारुती खामणकर यांच्याकडून सर्व पदांसाठीची उत्तरपत्रिका पोलिसांना मिळाली. त्यामुळे या प्रकरणात काही बडे मासे हाती लागण्याची शक्यता आहे. सूत्रधार खामणकर याचे यवतमाळमध्ये कोणाशी संबंध होते, त्याला कोणी उत्तरपत्रिका पुरवली या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यवतमाळला जाणार आहेत. विविध पदांसाठी परीक्षा देणारे मात्र पुरते घाबरले आहेत.
दरम्यान, ही परीक्षाच रद्द होऊ शकते काय याचा निर्णय करण्यासाठी ती उत्तरपत्रिका तपासावी लागेल. त्यानंतर यंत्रणेत कोठे दोष आहेत हे शोधू, असे यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले अटक करण्यात आलेले आरोपी दलालीचे काम करीत होते. उत्तरपत्रिका घेणारा शोधायचा, व्यवहार ठरवायचा व सूत्रधार खामणकपर्यंत न्यायचे, अशी कामाची पद्धत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2014 1:40 am

Web Title: yavatmal zp recruitment
Next Stories
1 खरीप उत्पादकता घटली, रब्बीचीही ८ टक्केच पेरणी!
2 अफगाणिस्तानकडे पळू पाहणाऱ्या दोघा संशयितांच्या साथीदारांचा शोध
3 तीन लाख वैष्णवांच्या साक्षीने ‘कार्तिकी’चा सोहळा रंगला
Just Now!
X