जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत करोना रूग्णांची संख्या ५९ ने वाढली. गुरुवारी ४० तर शुक्रवारी १९ नवीन सकारात्मक रूग्णांची भर पडली. पुसद तालुक्यातील श्रीरामपूर व चोंढी येथील ५६ व ५० वर्षीय महिलांचा गेल्या दोन दिवसांत मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २३ वर पोहचली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या ११ रूग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबधितांची संख्या ७०० वर पोहचली.

सकारात्मक आलेल्या ५९ रूग्णांमध्ये ४० पुरुष व १९ महिलांचा समावेश आहे. यात दिग्रस येथील पाच पुरूष व तीन महिला, पुसद येथील पार्वतीनगरातील एक महिला, पुसद येथील तीन पुरुष व एक महिला, वणी येथील एक पुरूष, पांढरवकडा येथील अकरा पुरूष व दोन महिला, यवतमाळ शहरातील साईनाथ लेआऊट येथील एक पुरूष, यवतमाळ येथील दोन पुरूष व तीन महिला, दारव्हा येथील एक पुरूष व पाच महिला, आर्णी येथील एक पुरूष, यवतमाळ शहरातील इस्लामपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील वसंत नगर येथील एक पुरुष, प्रभात नगर येथील एक पुरुष, दिग्रस येथील एक पुरुष, दिग्रस तालुक्यातील खडसा येथील एक पुरुष, महागाव येथील सहा पुरुष व दोन महिला, उमरखेड येथील एक महिला, पुसद शहरातील वसंत नगर येथील एक महिला, घाटंजी येथील तीन पुरुष, नेर तालुक्यातील मोझर येथील एक पुरूष यांचा समावेश आहे. तर गुरूवारी आठ व शुक्रवारी तीन अशा ११ रूग्णांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात सक्रिय सकारात्मक रुग्णांची संख्या २३४ इतकी आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे १५९ तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे ७५ जणांचा अहवाल सकारात्मक आला. आतापर्यंत सकारात्मक रुग्णांची संख्या ७०८ वर पोहचली. यापैकी ४५१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.