वाई: गडद पिवळ्या रंगाचा बेडूक म्हणजे कोणत्याही रासायनीक प्रदूषणाचा परिणाम नसून निसर्गात: या रंगाचे बेडूक पहायला मिळतात. पर्जन्यमानाचे द्योतक असणाऱ्या या सोन्या बेडकांनी तामजाईनगर भागात ‘डराव डराव’चा कल्लोळ ऐकायला मिळाला. मादी बेडकांना साद घालणाऱ्या त्यांच्या या  आवाजाने परिसरातील बघ्यांची गर्दी झाली होती.

पाऊस सुरू झाल्यानंतर अचानकपणे आपल्या आजूबाजूस या पिवळ्याधमक नर सोन्या बेडकांचा मादी बेडकांना साद घालणारा डराव डरावचा आवाज कानी येतो. साताऱ्याच्या तामजाईनगरमध्ये या बेडकांनी दर्शन दिले. नंतर येणाऱ्या चांगल्या पावसाचा किंवा सलगपणे पाऊस चालू राहील याचे द्योतक मानले जाते. मादी बेडकांनी अंडी दिल्यानंतर त्यातून प्रौढ बेडूक तयार होईपर्यंत निरंतर पाऊस सुरू राहणार, असे मानले जाते.

nagpur, New Underpass, Road Under Railway line, Manas Chowk, Causes Issues, Large Vehicles, Traffic Congestion,
मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

मानवासाठी बेडूक अनेक दृष्ट्या सहाय्यभूत ठरला आहे. तो कीटकभक्षी असल्याने उपद्रवी कीटकांची संख्या आटोक्यात राहते. मात्र प्रदूषण, अधिवास क्षेत्राचा ऱ्हास, इ. कारणांनी बेडकांच्या संख्येत घट झाल्याचे आढळून आले आहे. जागतिक तापमान वाढीमुळे बेडकांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. अन्नसाखळीतील हा महत्त्वाचा घटक समजला जातो. हा शीत रक्ताचा प्राणी असल्याने त्याच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते.  बेडूक हे सापाचं खाद्य आहे. तर सांडपाण्यावर बसणाऱ्या डासा, डासांची अंडी, कीटकनाशके हे बेडकाचे खाद्य आहे.  गोव्यामधील काही हॉटेलमध्ये बेडकाचे सुप देखील बनविले जाते.साधारणता एक महिना याचा रंग पिवळा असतो. या दिवसात त्यांचा मेटिंग सीजन असतो. पिवळा बेडूक हा नर असतो. तर राखाडी कलरची मादी असते.पिवळा बेडूक हा मादीपेक्षा आकाराने लहान असतो. तर मादी आकाराने मोठी असते. मादीला आकर्षित करण्यासाठी तो मोठ्याने आवाज काढत असतो. या पंचवीस दिवसाच्या काळामध्ये ही बेडूक अंडी घालतात. एक महिन्यानंतर पिवळ्या बेडकाचा कलर हा राखाडी कलर सारखा परत होतो.

प्राणी अभ्यासक सागर कुलकर्णी बोलताना म्हणाले कि, सामान्यतः भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांग्लादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, मालदीव, श्रीलंका या प्रदेशात आढळणारा हा बेडूक इतर बेडकांच्या तुलनेने मोठा, भारी व वजनदार असून त्यावरूनच त्यास इंग्रजीत ‘बुलफ्रॉग’ म्हणतात. सोनेरी रंगामुळे मराठीत सोन्या बेडूक म्हणून ओळखले जाते. गोड्या पाण्याच्या पाणथळ जागा, नद्या, तलाव, ओढे, डबकी यांसारख्या ठिकाणी हा आढळून येतो. परंतु उथळ पाण्याच्या डबक्यांना हा प्राधान्य देतो. त्यामुळे उघडे रानमाळ, नागरी वस्त्यांच्या कडेला साठलेल्या पाण्यात तो सहजासहजी दिसून येतो.”

नराच्या खालच्या जबड्याच्या त्वचेमध्ये मागील बाजूस सैल त्वचेच्या पिशव्या असून मादीला मीलन फुगवटे आणि स्वरकोश नसतात. श्वसन संस्थेतील स्वरयंत्रामुळे नर मीलन काळात ‘डराव डराव’ असा आवाज काढतात. नरात असलेल्या स्वरकोशामुळे आवाजाचे ध्वनिवर्धन होते. नर हा मादी बेडकास आकर्षित करण्यासाठी त्याचा वापर करतात व प्रजनन पूर्ण करतात. प्रजनन झाल्यानंतर मादी उथळ डबक्यांमध्ये अंडी घालते, अशी पुष्टी मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी जोडली.