News Flash

येवल्यात चिमुरडीचा अपघात, प्रकृती चिंताजनक

येवल्यातील लक्ष्मीनारायण रस्ता परिसरात ही घटना घडली.

मोशीत गळफास घेऊन महिलेनं जीवनयात्रा संपवली.

वेगाने जाणा-या मालवाहू लहान टेम्पोने एका दीड वर्षीय चिमुरडीला धडक दिली. तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येवल्यातील लक्ष्मीनारायण रस्ता परिसरात ही घटना घडली. अवजड वाहतुकीमुळे होणा-या अपघातांचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासनाने याबाबत ठोस कृती करण्याचे आवाहन नागरिकांकडून केले जात आहे.

रणवी संतोष सिंधी (दीड वर्ष) हे या चिमुकलीचे नाव असून. लक्ष्मीनारायण रस्त्याच्या कडेला ती आपल्या भावासोबत घराच्या अंगनात खेळत होती. या रस्त्यावरून वेगाने जाणारा रेतीचा मालवाहु छोटा हत्ती ट्रक तिच्यावर येवून धडकला. तिच्या डोक्याला यामुळे गंभीर मार बसला आहे. तिला तात्काळ नाशिक येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

शहरात दुचाकी, विटा- वाळू वाहून नेणारी लहान मोठी वाहने भरधाव वेगाने जातात. मालवाहतुक करणा-या वाहनचालकांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा संताप येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2017 7:38 pm

Web Title: yeola accident mini tempo girl injured
Next Stories
1 नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचे नाशिकमध्ये आंदोलन
2 भारतीय सैन्याने सादर केलेली प्रात्यक्षिके पाहून भारावले नाशिककर
3 Nagar parishad Result: रामटेकमध्ये शिवसेनेला धक्का, भाजपची एकहाती सत्ता
Just Now!
X